
Pune College Responds to Viral Casteism Video Reveals Why Job Reference Was Not Issued
Esakal
पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमुळे आपली नोकरी गेल्याचा दावा करत प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाने गंभीर आरोप केले होते. त्यानं सोशल मीडियावर व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ केल्यानं ब्रिटनमधील कंपनीतली नोकरी गमावण्याची वेळ आल्याचं तरुणाने म्हटलं होतं. आता या संदर्भात मॉडर्न कॉलेजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसंच तरुणाला प्रमाणपत्र दिल्याची माहितीसुद्धा दिली. तर प्रेम याने महाविद्यालयाची बदनामी केली आणि खोटे आरोप केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.