
गणेश कला क्रीडा मंदिर येथे रविवारी 'एल्गार परिषद 2021' भरविण्यात आली होती.
पुणे : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करणे व धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज स्वारगेट पोलिसांकडे देण्यात आला आहे. गणेश कला क्रीडा मंदिर येथे रविवारी 'एल्गार परिषद 2021' भरविण्यात आली होती.
- सिरमच्या लशीची बजेटमध्ये घोषणा: न्युमोनियाची लस होणार राष्ट्रीय मोहीम
या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी यांनाही भाषणासाठी आमंत्रिकत केले होते. त्यानुसार, त्याने त्यांनी या परिषदेला हजेरी लावली. त्याचबरोबर आपल्या भाषणात भारतीय संघराज्यविरोधात व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली. हिंदू समाज सडलेला आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केल्याचा उल्लेख ऍड.प्रदीप गावडे यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये केला आहे.
- 'मलासु्द्धा सोसावं लागतं'; असं का म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
संबंधीत विधान हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. उस्मानी यांनी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत मी भारतीय संघराज्य मानत नाही, असेही विधान केले आहे. त्यांचे हे विधान भारतीय संघराज्याचा अपमान करणारे व भारतीय संघराज्याबाबत घृणा निर्माण करणारे आहे. हा भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 124 (अ) अनुसार गुन्हा आहे. तरी उस्मानी यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी ऍड.गावडे यांनी स्वारगेट पोलिसांकडे दिलेल्या आपल्या तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)