पुणे : क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सशर्त परवानगी

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सशर्त परवानगी देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.५) संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Summary

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सशर्त परवानगी देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.५) संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

पुणे - पुणे शहर, (Pune City) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धांचे (Sports Competition) आयोजन करण्यास सशर्त परवानगी (Permission) देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.५) संबंधित अधिकाऱ्यांना (Officer) दिला. यानुसार शाळा,महाविद्यालये आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना एकूण क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येणार आहे.

या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शहरात महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवडमध्ये पालिका आयुक्त राजेश पाटील आणि ग्रामीण भागातील स्पर्धांसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ajit Pawar
बारामतीत महावितरणच्या अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनीच ही माहिती दिली. राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून म्हणजेच सुमारे २२ महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धा बंद आहेत. एवढेच नव्हे तर, सुमारे पावणेदोन वर्षे खेळाडूंना आपापल्या खेळांचा सराव करण्यासाठीही खेळाची मैदाने उघडी नव्हती. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत कोरोनाचे दोन डोस पूर्ण झालेल्या खेळाडूंना सरावासाठी खेळाची मैदाने खुली करण्यात आली होती.

पवार म्हणाले, ‘राज्य सरकारच्या कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धाना २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत पुणे शहर व जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबतच विभागीय आयुक्त सौरभ राव आणि दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com