Pune Corona Update: जिल्ह्यात 359 नवे रुग्ण, कोरोना चाचण्यांची संख्या अडीच हजारांवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील केवळ 139 रुग्णांचा समावेश आहे. 

पुणे- पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.16) दिवसभरात एकूण 359 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. सोमवारी कोरोना चाचण्यांची संख्या ही अडीच हजारांपर्यंत खाली आली आहे. दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील केवळ 139 रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, गेल्या 24 तासांत 375 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील चार, पिंपरी-चिंचवड तीन, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक आणि नगरपालिका क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

हेही वाचा- अष्टविनायक महागणपतीचे मंदिर उघडलं; नियमांचे पालन करण्याचं आवाहन

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णांलयात 4 हजार 32 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 5 हजार 282 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 31 हजार 777 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 14 हजार 447 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  आतापर्यंत 8 हजार 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 379 रुग्ण आहेत.

हेही वाचा- कोरोना मृत्यूच्या कारणांचे आता "पोस्टमार्टेम';मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न

सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये 93, जिल्हा परिषद क्षेत्रात 92, नगरपालिका क्षेत्रात 27 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 10 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही रविवारी (ता.15) रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी (ता.16) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Corona Update 359 new patients in district number of corona tests over 2500