
कोरोना प्रतिबंधक लशीच्या दुसऱ्या डोसचा टप्पाही ९४ टक्के पूर्ण झाला असल्याने आता महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या कमी केली आहे.
पुण्यात दुसरा डोस ९४ टक्के पूर्ण
पुणे - कोरोना प्रतिबंधक लशीच्या (Corona Vaccine) दुसऱ्या डोसचा (Second Dose) टप्पाही ९४ टक्के पूर्ण झाला असल्याने आता महापालिकेने (Municipal) लसीकरण केंद्रांची संख्या कमी केली आहे. कोरोना लस घेण्यासाठी केंद्रांवर मिळणारा प्रतिसाद सातत्याने कमी असल्याने हा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
पुणे शहरात जानेवारीमध्ये कोरोनाचा ऑमिक्रॉन हा नवीन व्हेरियंटचा उद्रेक झाला होता. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली होती. पण, आता बहुतांश पुणेकरांनी लस घेतली आहे. त्यातून केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांसाठी संख्या कमी झाली आहे. त्या वेळी लसीकरणाचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने १७९ केंद्रांवर लशीची व्यवस्था केली होती.
केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असल्याने लस वाया जाण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे यापुढे केंद्रांची संख्या ६९ पर्यंत कमी करण्यात आली आहे. या ६९ केंद्रांपैकी ३० केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्स ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय सर्वच ६९ केंद्रांमध्ये कोवॅक्सीन आणि कोविशील्ड लस देण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे शहरात मोठ्या संख्येने लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे केंद्रांवरील गर्दी कमी होत आहे. केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिक नसतील तर, फोडलेल्या लशीतील उर्वरित डोस वाया जात आहेत. लहान मुलांसाठी देणाऱ्या येणाऱ्या कोर्बेव्हॅक्सच्या एका व्हायलमध्ये २० डोस आहेत. त्यामुळे या केंद्रांची संख्या कमी करून ३० करण्यात आली आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, महापालिका, पुणे
Web Title: Pune Corona Vaccine Second Dose Is 94 Percent Complete
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..