esakal | Pune : ७५ तासात केवळ सोळाशे जणांचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

Pune : ७५ तासात केवळ सोळाशे जणांचे लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरात आयोजित करण्यात आलेल्या ७५ तास लसीकरण मोहिमेत केवळ १ हजार ६१० जणांनीच सहभाग घेतला. महापालिकेतर्फे मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूड येथील सुतार दवाखान्यात ७५ तास लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी दोन्ही रुग्णालयांसाठी प्रत्येक शिफ्टसाठी ५ याप्रमाणे १५ जणांचे पथक देण्यात आले होते. त्यामध्ये डॉक्टर, नर्स आदींचा समावेश होता.

हेही वाचा: MI vs SRH : मुंबईचा अर्धा संघ तंबूत, अखेरच्या षटकात सूर्यावर नजरा

अद्यापही अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत, अनेकांना काम बुडवून लसीकरणासाठी येता येत नाही, अशा नागरिकांना याचा लाभ होईल यादृष्टीने सलग ७५ तासाचे लसीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते.त्यानुसार ५ आॅक्टोबर सकाळी १० ते ८ आॅक्टोबर दुपारी एक वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.

सुतार दवाखान्यात एकूण १ हजार ११० जणांचे तर कमला नेहरू रुग्णालयात ५०० जणांनी लस घेतली. दरम्यान, महापालिकेच्या एका केंद्रावर सरासरी दिवसाला १२ तासात ३०० जणांचे लसीकरण करणे शक्य आहे. त्यामुळे साडे चार ते पाच हजार जणांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेणे आवश्‍यक होते. पण कमी प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

‘‘महापालिकेतर्फे कमला नेहरू रुग्णालय आणि सुतार दवाखान्यात सलग ७५ तास लसीकरण करण्याचा उपक्रम राबविला. त्यामध्ये १ हजार ६१० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. ’’

-रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

७५ तासात असे झाले लसीकरण

  • ५ ऑक्टोबर - ५६१

  • ६ ऑक्टोबर - ५०४

  • ७ ऑक्टोबर - ३३९

  • ८ ऑक्टोबर - २०६

loading image
go to top