Pune Corporation Election : प्रारूप प्रभाग रचनेच्या कामाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune Corporation Election : प्रारूप प्रभाग रचनेच्या कामाला गती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू असून, निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषांचे पालन करून हे काम होत आहे की नाही याचा आढावा शनिवारी (ता. १३) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला.

हेही वाचा: NZ vs AUS Final: कोण ठरेल वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते...

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीनचा सदस्यांचा प्रभाग असणार आहे. कोरोनामुळे जनगणना होऊ शकलेली नाही, त्यामुळे या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या १० वर्षात लोकसंख्या वाढल्याने कायद्यात बदल करून सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय मुंबई सोडून इतर सर्व महापालिकांसाठी घेतला आहे. यामध्ये पुणे महापालिकेची सदस्यसंख्या १६१ वरून १७३ इतकी निश्‍चीत करण्यात आली आहे. ही नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने प्रभागांचा आकार कमी होऊन त्यांची संख्याही ४२ वरून ५५ इतकी होणार आहे.

२०२२ च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी होणार याकडे नगरसेवक, इच्छुक उमेदवार, राजकीय कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. यापूर्वी प्रभाग रचना कशी होऊ शकते याचे आखाडे बांधले जात होते. पण आता नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने नेमका कोणता प्रभाग कसा तोडणार, नवा प्रभाग कसा तयार होणार, त्याला कोणता भाग जोडणार हे सर्वच गुलदस्त्यात आहे. निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे प्रभाग रचनेचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा: मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार?

याकामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सध्या कामाची स्थिती आहे आहे, अडचणी काय येत आहेत यावर चर्चा केली. हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सद्यःस्थिती काय आहे हे सांगितले. प्रभाग रचनेचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, काही भागाचे काम शिल्लक आहे. ३० नोव्हेंबरच्या पूर्वी प्रारूप आराखडा तयार होईल, असे बैठकीत सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top