Pune Youth Attacked with Machete in Front of Ganesh Mandal

Pune Youth Attacked with Machete in Front of Ganesh Mandal

Esakal

ऐन गणेशोत्सवात पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार, मंडळासमोरच तरुणावर कोयत्यानं हल्ला; घटना CCTVत कैद

Pune Crime News : पाषाणमध्ये जुन्या वादातून तरुणावर गणपतीच्या मंडळासमोरच कोयत्यानं वार करण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आलंय.
Published on

पुण्यात गणेशोत्सव उत्साहात सुरू असतानाच पाषाणमध्ये मुळशी पॅटर्नचा थरार बघायला मिळाला. जुन्या वादातून तरुणावर गणपतीच्या मंडळासमोरच कोयत्यानं वार करण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दिसतं की तरुणावर पाठलाग करत वार केले. पाठलाग करणाऱ्याने तरुण खाली पडला तरी त्याच्यावर हल्ला केला. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. तरुणावर कोयत्याने वार केल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळं उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

Pune Youth Attacked with Machete in Front of Ganesh Mandal
भरधाव कार ओव्हरटेक करताना मागून ट्रकला धडकली, ५ जणांचा मृत्यू; कटरने कापून मृतदेह काढले बाहेर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com