Kondhwa Police Raid Lodge at Bopdev Ghat
Sakal
पुणे : बोपदेव घाट परिसरातील लॉजवर बांगलादेशी तरुणीकडून देहविक्री चा व्यवसाय करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यांना देहविक्रीसाठी प्रवृत्त करणाऱ्या दोन व्यवस्थापकांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. तसेच दोन बांगलादेशी तरुणींनाही ताब्यात घेतले. व्यवस्थापक रवी छोटे गौडा (वय ४६, रा. येवलेवाडी, कोंढवा) व कामगार सचिन प्रकाश काळे (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.