Pune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्या

Pune Crime
Pune Crime

पुणे - पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pune Crime news in Marathi

Pune Crime
Pune Crime : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; सहा गंभीर, ११ अटकेत

नागेश सिद्धाप्पा चिंचोळे (वय १७, रा. जाधव नगर , वडगाव बुद्रुक, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश हा वडगाव मधील पाऊंजाई मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या प्लॉटमध्ये एका मैत्रिणी सोबत गप्पा मारत होता.

दरम्यान त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेशच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा खून प्रेमप्रकरणातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com