
Pune Crime : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; सहा गंभीर, ११ अटकेत
पुणे : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार दोन गटात पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला. हे सर्व जण २० ते २५ वर्ष वयोगटातील आहेत. दरम्यान या घटनेनंतर परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही गटाकडून कुऱ्हाड, चाकूने एकमेकांवर वार करण्यात आले. या घटनेत सहा जण गंभीर जखमी असून पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. या प्रकारानंतर रब्बील शेख यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
शुभम बाळकृष्ण उमाळे, हितेश उर्फ सतीश चांदणे, प्रज्योत ऊर्फ मोन्या बाळकृष्ण उमाळे, आकाश ऊर्फ आकु संजय वाघमारे, सलमान नासिर शेख, दीपक राजेंद्र डोके,रब्बील रज्जाक शेख, शहबाज सलीम शेख, रब्बीन रफिक शेख, प्रतिक सचिन सपकाळ, मुस्तफा जहीर खान अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा: Ramdas Athawale : "मोदींनी आणलेले चित्ते पाहायला जाणार अन् एक चित्ता घेऊन येणार"
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्रासह दुचाकीवरुन शुक्रवारी रात्री ११ वाजता खडकीकडे जात होते. पूर्वीच्या भांडणातून आरोपींनी त्यांना थांबवून तुला जिवंत साेडणार नाही, माझ्याकडे कशाला बघितले असे म्हणून त्याच्याकडील चाकूने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी इतर साथीदार देखील तेथे जमले आणि एकमेकावर हल्ला केला. एकमेकांनी लाकडी दांडके, कुऱ्हाड, कमरेचा पट्टा वापरून हल्ला केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: बच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्ली