Pune Crime: व्यसनासाठी केली मैत्री मग केली हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime: व्यसनासाठी केली मैत्री मग केली हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार

जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील सेवानिवृत्त लिपीक अशोक लक्ष्मण चौधरी वय.६१ यांच्या खूनाचा सहा दिवसात छडा लावून खुन्याला जेरबंद करण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील टोकवडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी दिली.

संदीप धनाजी पवार, वय ३२, रा. गणेशपुर,पो. मिल्हे, ता. मुरबाड, जि. ठाणे असे अटक आरोपीचे नाव असून तो काही दिवसा पूर्वी जुन्नर तालुक्यातील ओतूर परीसरात हॉटेल वर काम करत असताना मयताची व त्यांची ओळख झाली होती.सदर आरोपी हा व्यसनाच्या व जुगाराच्या आधीन गेल्याने मयताच्या अंगावरती असणारे तीन तोळ्याची सोन्याची चैन व चार अंगठ्या याकरिता आरोपीने अशोक चौधरी यांचा खून केल्याचे निष्पण्ण झाले.

याबाबत टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक म्हणाले की १८ नोव्हेंबर रोजी धनाजी मालु पवार यांनी फिर्याद दिली की त्यांच्या शेतावर मिल्हे गाव शिवारात अंदाजे साठ वयाचे एक अनोळखी व्यक्तीचे कोणीतरी कशाने तरी मारून त्याचा खून करून प्रेतावर पेट्रोल व डिझेल टाकून ते पेटवून देऊन नष्ट करण्याच्या इराद्याने त्यांच्या शेतात फेकून देऊन गावतामध्ये भाताच्या पेंढ्यात व गवतामध्ये झाकून टाकून दिलेला बेवारस मृतदेह आहे.याबाबत त्वरीत टोकावडे पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सदर बेवारस मृतदेहाची पहाणी करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.३

Pune Crime: व्यसनासाठी केली मैत्री मग केली हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune News : शनिवार पेठेत तरुणाचा मृत्यू; फांदी धोकादायक झाल्याने ती काढून टाकावी अशी ऑनलाइन तक्रार

टोकावडे पोलीसांनी या गुन्हाचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य ते तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी करून सदर बेवारस मृतदेह हा अशोक लक्ष्मण चौधरी, वय ६१ रा.उदापूर ता.जुन्नर,जि.पूणे येथील असे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मयताची ओळख त्यांचे नातेवाईका करवी पटवण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.तसेच याच वेळी तपासा दरम्यान संशयित मुख्य आरोपी हा संदीप धनाजी पवार असल्याची खात्री पटल्याने त्याचा ही शोध घेण्याचे काम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते.

दरम्यान ठाणे शहर हद्दीमध्ये डोंबिवली तसेच विठ्ठलवाडी परिसरामध्ये आरोपी ओळख लपून राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस उपनिरीक्षक एस.आर.संसारे,पोलीस हवालदार एन.एच.घाग,एम.जी.आहिरे व पोलीस मित्र राजू पवार यांच्या पथकाने सलग चार दिवस वेश बदलून आरोपीचा पाठलाग केला.

Pune Crime: व्यसनासाठी केली मैत्री मग केली हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : दोन महिन्यांपासून फरार असणारा मोक्का गुन्ह्यातील आरोपी हत्यारासह जेरबंद

व्यसनाच्या व जुगाराच्या आधीन गेल्याने...

आरोपी हा गर्दीच्या ठिकाणी तसेच ट्रेनमधून प्रवास करून आपले लपत होता,शेवटी आरोपीस के.के रॉयल रेसिडेन्सी, उल्हासनगर परिसरातून सापळा रुचून ता.२४ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यास अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयात आरोपीस ता.३० नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली होती.

तपासा दरम्यान आरोपी हा व्यसनाच्या व जुगाराच्या आधीन गेल्याने मयताच्या अंगावरती असणारे तीन तोळ्याची सोन्याची चैन व चार अंगठ्या याकरिता आरोपीने मयताचा खून केल्याची माहिती दिली.तसेच आरोपी हा मयताचे नातेवाईकांशी मोबाईलद्वारे व्हाट्सअप चॅट द्वारे तो जिवंत असून त्याला पैशाची गरज आहे असे भासवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान टोकवडे पोलीसांनी अचूक व वेगवान तपास करून अतिशय गुंतागुंतीचा असा गुन्हा उघडकीस आणून आरोपी जेरबंद केल्याने पूणे व ठाणे जिल्हातून सर्वत्र टोकवडे पोलिसांचे कौतूक केले जात आहे.

Pune Crime: व्यसनासाठी केली मैत्री मग केली हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : पुराणा हिसाब बाकी है; रिक्षातून आलेल्या टोळक्याने आईस्क्रीमवाल्यावर केला सशस्त्र हल्ला

तंत्रज्ञानाचा वापर करून मृतदेहाची ओळख पटली

टोकावडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी म्हणाले की बेवारस अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड होते. तसेच आरोपी मयताच्या मोबाईल वरून मयताच्या नातेवाईकाच्या संपर्कात राहून मयत अशोक चौधरी जीवंत असल्याचे नातेवाईकास भासवत होता.त्यामुळे नातेवाईकही निर्धास्त होते.

मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून मृतदेहाची ओळख पटली.त्यामुळे संशयीत आरोपी चा ही शोध घेता आला.संदीप धनाजी पवार हा व्यसनी असल्याने त्यानी मयताच्या आंगावरील सोन्याच्या दागीन्यासाठी चौधरी यांचा खून केला.तसेच नातेवाईकांशी वॉटअप व्दारे संपर्क राहून आपण जिवंत आहे याची खात्री पटवून देवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता.नागरीकानी सतर्क राहणे गरजेचे असून डाग दागिने आपल्या जीवावर बेत शकतात.त्यामुळे बाहेर मित्र परीवारत फिरताना ते जवळ बाळगू नये अन्यथा अश्या घटनाची पुनरावृत्ती होऊ शकते

Pune Crime: व्यसनासाठी केली मैत्री मग केली हत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime: झटपट पैशांसाठी चोरांनी सतरा लाखांचा जेसीबी पळविला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com