इंदापूर : अवैध गुटख्यासह ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त | Pune Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

इंदापूर : अवैध गुटख्यासह ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

इंदापूर : इंदापूर पोलिसांनी शहरानजीक पायल सर्कल जवळ तब्बल २२ लाख २७ हजार ५०० रुपये किंमतीचा अवैद्य गुटख्यासह वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह एकूण ४७ लाख २७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. एका महिन्यात इंदापूर पोलिसांनी अवैध गुटख्यावर केलेली ही दुसरी कारवाई आहे. (Pune Illegal business)

यासंदर्भात पोलीस शिपाई सुहास आरणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हनीफ सय्यद ( रा. बेंगलोर) व कंटेनर नंबर केए ०१ एएफ ३३९६ च्या मालका विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा: अखेर नितेश राणे प्रकटले! थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत लावली हजेरी

दि. ९ जानेवारी रोजी इंदापूर शहरानजीक पायल सर्कल जवळ आयशर कंपनीचाकंटेनर व ऊसाने भरलेला ट्रॅक्टर यांचा अपघात झाला होता. कंटेनरचा चालक हनीफ सय्यद याच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला होता. यामध्ये कंटेनर चालक किरकोळ उपचारासाठी पुणे येथे दाखल झाला होता.

परंतु तीन दिवस सदर कंटेनर कडे कोणीही न फिरकल्याने पोलिसांना वाहनात असलेल्या मालाविषयी संशय आल्याने त्यांनी कंटेनरचे पाठीमागील सील तोडून पाहिले असता कंटेनर मध्ये २२ लाख २७ हजार ५०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा आढळून आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक गुटका वाहतूक केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा: अपघातात मृत्यू झालेल्या झोमॅटो बॉयच्या पत्नीला कंपनीकडून नोकरी

सदर कारवाई कंटेनर मध्ये २२ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीच्या गुटख्याची प्लॅस्टिकच्या ६ पिशव्या तसेच प्रत्येकपिशवीत ५५ पॅकबंद पुडे आढळले असून यामध्ये आर के प्रीमियम कंपनी च्या गुटख्याच्या ७५ पुड्या सापडल्या आहेत. तसेच कंटेनरची एकूण किंमत २५ लाख रुपये असून एकूण ४७,२७,५०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत. या कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, पोलीस उपनिरीक्षक लिगाडे,पोलीस उपनिरीक्षक पाडुळे व जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस हवालदार बालगुडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस शिपाई नरळे, पोलीस नाईक मल्हारे ,पोलीस नाईक मनोज गायकवाड, पोलीस नाईक साळवे, पोलीस शिपाई केसकर, पोलीस शिपाई चौधर, पोलीस नाईक अरणे, पोलीस शिपाई शिंगाडे, पोलीस नाईक मामा चौधर, महिला पोलिस हवालदार खंडागळे यांनी सहभाग घेतला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrime
loading image
go to top