पुणे : दारु पिऊ दिली नाही म्हणून, जाळली पार्किंगमधील वाहने

pune crime man burned vehicles for not permitted to drink in auto
pune crime man burned vehicles for not permitted to drink in auto

पुणे : पुण्यात पार्किंगमधील वाहनांना आग लागल्याचा प्रकार आज, सकाळी उघडकीस आला होता. पण, ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचं पोलिस तपासात उघड झालयं. दारू पिऊन दिली नाही, या शुल्लक कारणामुळे एका माथेफिरूने ही आग लावल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

कोठे घडली घडना?
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) इमारतीमधील पार्किंगमधील गाड्यांना आग लागल्याची घटना घडली होती. यात सहा वाहने जळून खाक झाली, तर सात वाहनांना मोठ्या प्रमाणात झळ बसली. आज (रविवार) पहाटे दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुल परिसरामध्ये ही घटना घडली होती. रिक्षात बसून दारु पिण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एकाने हे कृत्य केले आहे.

पोलिस तपास काय सांगतो?
या प्रकरणी नितीश सकट (वय 27, रा. विघ्नहर्ता सोसायटी, राजीव गांधी नगर, दांडेकर पुल, सिंहगड रस्ता) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोपी गवळे (वय 22) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेंद्र धुमाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेकर पुलापासून काही अंतरावर "एसआरए' अंतर्गत बांधण्यात आलेली इमारत आहे. संबंधीत इमारतीमध्ये अन्य रहीवाशांसह सकट व गवळे हे दोघेही वास्तव्य करतात. फिर्यादी हे रिक्षाचालक असून, नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची रिक्षा इमारतीच्या पार्कींगमध्ये लावली होती. त्यावेळी गवळे हा फिर्यादींच्या रिक्षामध्ये बसून दारू पिण्याचा प्रयत्न करीत होता. त्या वेळी फिर्यादी यांनी त्यास विरोध केला. त्याचा राग मनात ठेवून गवळे यांनी रविवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास सकट यांच्या रिक्षासह पार्किंगमधील अन्य वाहनांना आग लावली. त्यामध्ये पाच दुचाकी एक रिक्षा जळुन खाक झाला. तर, सात वाहनांना आगीची मोठ्या प्रमाणात झळ बसल्याने त्यांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com