Police Arrest
Police Arrestsakal

पुणे : झील शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षासह तिघांना अटक

बोगस कर्मचारी दाखवून व विद्यार्थ्यांना जादा शुल्क आकारत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे.

पुणे : बोगस कर्मचाऱ्यांची माहिती राज्य सरकारकडे सादर करुन आणि विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारत सव्वा चार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मंगळवारी झील शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षासह तिघांना अटक करण्यात आली. त्यांना 8 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघड होण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संभाजी मारुती काटकर (वय 65, राजमहल, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), चंद्रकांत नारायण कुलकर्णी (वय 58, रा. अशोका आगम, दत्तनगर, कात्रज) व युवराज विठ्ठल भंडारी (वय 35, रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर यापुर्वी योगेश सुभाष ढगे यास पोलिसांनी अटक केली आहे. ढगे याने संबंधित संस्थेविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Police Arrest
Republic Day 2022: दिल्लीताल संचलनात पुणे विद्यापीठातील चार विद्यार्थी

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी काटकर हा झील शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे, तर चंद्रकांत कुलकर्णी हा झील पॉलिटेक्‍नीक कॉलेजचा तत्कालीन प्राचार्य, तर भंडारी हा लेखापरीक्षक आहे. ढगे हा संबंधित संस्थेमध्ये कार्यालयीन अधिक्षक म्हणून कार्यरत होता. चौघांनीही संगनमत करून हा गुन्हा केला आहे. ढगे याने काम सोडल्यानंतर त्याचे पैसे संस्थेने थकविले. त्यानंतर त्याने संस्थेविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा, काटकर व त्याच्या साथीदारांनी ढगेविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांनी केलेला गैरव्यवहार पुढे आला.

झील पॉलिटेक्‍नीकल कॉलेजच्या 2015-16 या वर्षीचा शुल्क मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. संबंधित प्रस्तावामध्ये प्रत्यक्षात 147 जण नोकरीवर असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून माजी विद्यार्थी व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे असे एकूण 191 कर्मचारी नोकरी करीत असल्याची खोटी कागदपत्रे सरकारकडे सादर केली. त्याद्वारे खोटी पगार पत्रके तयार करुन खर्चाच्या रकमेत जादा खर्च झाल्याचे दाखवून तो प्रस्ताव शुल्क मंजुरीसाठी राज्य सरकारच्या शुल्क निर्धरण समितीकडे पाठवित पैसे मंजुर करुन शासनाची फसवणूक केली.

Police Arrest
अजून खूप काही करायंच आहे : पद्मविभूषण प्रभा अत्रे

तसेच विद्यार्थ्यांकडून ठराविक रक्कम शुल्कापोटी घेणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात त्यांनी विद्यार्थ्यांकडून नियमापेक्षा जादा शुल्क आकारून विद्यार्थी, पालकांचीही फसवणूक केली. झील शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या झील पॉलिटेक्‍नीक कॉलेजच्या 2015-16 या शैक्षणिक वर्षात अशा विद्यार्थ्यांचे पालक व राज्य सरकारकडून जाद शुल्क आकारणी करून तब्बल 4 कोटी 25 लाख 29 हजार 482 रुपये इतक्‍या पैशांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले.

याच प्रकारे झील शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, व्यवस्थापन महाविद्यालय, एमसीए कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास ढोले यांनी हि कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com