Republic Day 2022: दिल्लीताल संचलनात पुणे विद्यापीठातील चार विद्यार्थी

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ येथे होणाऱ्या संचलनात राज्यातून आठ जणांची निवड करण्यात आली आहे.
Republic Day 2022
Republic Day 2022SAKAL

पुणे : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ येथे होणाऱ्या संचलनात राज्यातून आठ जणांची निवड करण्यात आली आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक असणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. (Republic Day 2022 Updates)

या संचलनात ऋतुजा शिर्के (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग- तृतीय वर्ष, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द), फिरदोस सय्यद (बीए- द्वितीय वर्ष, बी.पी.एच.ई. सोसायटी अहमदनगर कॉलेज), राज खवले (बी.कॉम- तृतीय वर्ष, एमईएस गरवारे वाणिज्य महाविद्यालय) आणि अशोक थिटमे (बीए-तृतीय वर्ष, संगमनेर कॉलेज) हे पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Republic Day 2022
"आपलं पहिलं राष्ट्रगीत" असं म्हणत कंगनानं शेअर केला व्हिडिओ!

नवी दिल्लीत एक जानेवारीपासून सुरू झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी झाले आहेत. ऋतुजा शिर्के ही शिरूर तालुक्यातील केंदूर येथील आहे. ती म्हणाली, ‘‘प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी देशभरातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यात माझी निवड झाल्याचा अभिमान आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही दिल्लीत सराव करत आहोत. संपूर्ण देशासमोर प्रजासत्ताक दिनी मला राज्याचे, गावाचे, विद्यापीठाचे आणि जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे,त्याचा विशेष आनंद आहे.’’

तर नगर येथील फिरदोस सय्यद म्हणाली,‘‘या संचलनासाठी जिल्हा, विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा विविध स्तरातून निवड केली जाते. हे सर्व स्तरातून माझी निवड झाल्याचा अभिमान आहे. संचलनासाठी आपली निवड होण्यासाठी ऑगस्ट २०२१ पासून तयारी करत आहे. संचलनात निवड व्हावी, यासाठी केलेल्या मेहनत सार्थकी लागल्याचा आनंद आहे.’’

राज म्हणाला,‘‘राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाल्यानंतर राज्याचे प्रतिनिधित्व करावे, असे स्वप्न पाहिले होते. येत्या प्रजासत्ताक दिनी ते साकार होत आहे. विद्यापीठाने व आमच्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले.’’ तर अशोक म्हणाला,‘‘प्रजासत्ताक दिनी राजपथ येथे होणाऱ्या संचलनात राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाला सहभागी होण्याची संधी मिळणे, ही अभिमानास्पद बाब आहे. आजवर राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत केलेल्या कामाचे फळ या रूपाने मिळाल्याचे समाधान आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com