Pune Crime : 15 वर्षीय मुलीने स्वत:च्या अपहणाचा रचला बनाव; मागितली 5 लाखांची खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

15 मुलीने स्वत:च्या अपहणाचा रचला बनाव; मागितली 5 लाखांची खंडणी

15 वर्षीय मुलीने स्वत:च्या अपहणाचा रचला बनाव; मागितली 5 लाखांची खंडणी

शिक्रापूर : कौटुंबिक मानसिक आस्वास्थ्याच्या कारणाने एका पंधरा वर्षिय मुलीने पळून जावून आपल्याच कुटुंबाकडे पाच लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार शिक्रापूर पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. विशेष म्हणजे आपल्याच मोबाईलवरुन आपले अपहरण झाल्याचा मेसेज टाकून तिने संपूर्ण कुटुंबाला मानसिक तणावात ठेवले. मात्र शिक्रापूर पोलिसांनी तक्रार दाखल होताच सहाच तासात या संपूर्ण कुटुंबाचा माईंड गेम उघडकीस आणला.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुळ छापरा (बिहार) येथील एक कुटुंब आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार घेवून आले होते. पाच लाखांची रक्कम तात्काळ द्या नाही तर तुमच्या मुलीला विसरा असा तो मेसेज होता. सदर अपहरणाची तक्रार दाखल करुन घेवून या बाबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पाठविली. दरम्यान संबंधित अल्पवयीन मुलीचा मोबाईल चालूच असल्याने त्यावरुन हे प्रकरण थेट तांत्रिक पथकाकडे पाठविण्यात आले व डॉ.देशमुख यांनी थेट बिहारचे त्या भागातील पोलिस अधिक्षक यांना माहिती देवून संबंधित पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना एकमेकांच्या संपर्कात ठेवले.

काही वेळातच संबंधित मुलगी पुणे-छापरा रेल्वेतून उतरताच तिला बिहार पोलिसांनी ताब्यात घेवून तीन दिवसांनी बिहार मध्ये पोहचलेल्या शिक्रापूर पोलिसांच्या तिला ताब्यात दिले. दरम्यान दि.४ रोजी अपहरण म्हणून दाखल या गुन्ह्यात सदर मुलगी बुधवारी (ता.१०) रोजी सुखरुपपणे तिच्या आई-वडीलांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मुलगी अल्पवयीन असल्याने या संपूर्ण कुटुंबाचेच मानसिक समुपदेशन करण्याचाही निर्णय शिक्रापूर पोलिसांनी घेतल्याचे शेडगे यांनी सांगितले.

हेही वाचा: "ST कर्मचाऱ्यांना कामावर यायचं पण भाजप कार्यकर्ते येऊ देत नाही"

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात गेल्यावर शेडगे यांच्या असे निदर्शनास आले की, संबंधित मुलीच्या कुटुंबियांचे घरातील एकमेकांबाबतचे वर्तन, कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य, काही कुटुंब सदस्यांची व्यसने यामुळे सदर मुलगी वैतागली होती. तिने अखेर एका अनामिकाच्या संपर्काने थेट मुळ गावी जाण्याचा निर्णय घेवून स्वत:च्या भविष्याचा विचार करुन पाच लाखांची मागणी स्वत:चे अपहरण झाले म्हणून आपल्याच कुटुंबीयांकडे केली. या संपूर्ण प्रकरणात स्वत: डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, उपअधिक्षक राहूल धस, यांचे मार्गदर्शनाखाली. पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलिस नाईक विकास पाटील, किरण निकम, अमोल चितारे, व्ही.एस.शिवणकर आदींनी विशेष योगदान दिले.

loading image
go to top