Pune Crime News : बिबवेवाडी परिसरात अनोळखी महिलेचा खून

पोलिस हवालदार गजानन खंडाळे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
pune crime update bibavewadi women killing case police marathi news
pune crime update bibavewadi women killing case police marathi newsesakal

Pune Crime News: महिलेच्या चेहऱ्यावर कठीण वस्तूने प्रहार करून खून केल्याची घटना बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम चौकात गोयल गार्डनसमोर घडली. खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

याबाबत पोलिस हवालदार गजानन खंडाळे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंगाधाम चौक परिसरात गोयल गार्डनजवळ जय संतोषी माँ आयुर्वेदिक कॅम्प नावाने कापडी तंबू आहे. शनिवारी सकाळी या तंबूत एक महिला मृतावस्थेत आढळल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळाली.

pune crime update bibavewadi women killing case police marathi news
Pune Accident News : कोथरुड परिसरात मद्यधुंद मोटारचालकाची वाहनांना धडक

महिलेच्या चेहऱ्यावर कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याचे समोर आले. खून झालेल्या महिलेचे वय सुमारे ४० ते ४५ वर्षे आहे. ही महिला आयुर्वेदिक औषधी विक्रीचा व्यवसाय करीत होती. अज्ञात व्यक्तीने तिच्या चेहऱ्यावर कठीण वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठविला आहे. खुनामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com