DJ Sound
पुण्यात दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिबवेवाडी येथील श्रीकृष्ण तरुण मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ ठरलेय. परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त लाऊड स्पीकर लावून ध्वनी प्रदूषण केल्याचा मंडळावर आरोप आहे.