Pune Dam News : निरा देवघर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू ; पाच पैकी दोन दरवाजे उघडले !

Dam News : धरणातून १ हजार ३४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
Pune Dam News : निरा देवघर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू ; पाच पैकी दोन दरवाजे उघडले !
sakal

Pune Dam News : पुणे तालुक्यातील निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शनिवारी (ता १९) रात्री निरा देवघर धरण १०० टक्के भरले.

त्यामुळे विद्युतगृहद्वारे नीरा नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या ७५० क्युसेक विसर्ग मध्ये वाढ करुन सोमवारी (ता २१) सकाळी सांडव्यामधून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

Pune Dam News : निरा देवघर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू ; पाच पैकी दोन दरवाजे उघडले !
Jalgaon Dam Water : पारोळ्यातील प्रकल्प तहानलेले; अत्यल्प जलसाठ्याने चिंता वाढली

सोमवारी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये ५९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सद्यस्थितीत विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक आणि सांडव्यातून ५९० क्यूसेक एकूण १ हजार ३४० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.

Pune Dam News : निरा देवघर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू ; पाच पैकी दोन दरवाजे उघडले !
Koyna Dam : कोयना धरण ८० टक्के भरले

पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी-अधिक बदल होऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, नीरा देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Dam News : निरा देवघर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू ; पाच पैकी दोन दरवाजे उघडले !
Pavana Dam : पवना धरण @ ९७.७३; अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षाच

नागरिकांनी कृपया नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. असे आवाहन करण्यात आले असल्याचे नीरा पाटबंधारे विभागाचे श्रेणी एक चे सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com