Vidhan Sabha 2019 : असा असेल काँग्रेसचा पुण्याचा विकासाचा प्राधान्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी सोडविणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे, भ्रष्टाचार कमी करणे हा पुण्याच्या विकासाचा कॉंग्रेसचा अजेंडा आहे.

पुणे : पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी सोडविणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे, भ्रष्टाचार कमी करणे हा पुण्याच्या विकासाचा कॉंग्रेसचा अजेंडा आहे.

याबाबत, कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले, ''वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबरच शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे पाचशे चौरस फुटांचे घर देणे, वाहतुकीची समस्या सोडविणे, सुनियोजीत शहर निर्माण करणे आदींवर कॉंग्रेसचा भर असेल''. शहरातील विविध जाती-धर्मांतील नागरिकांची संख्या लक्षात घेऊन सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करणे हे ही कॉंग्रेसचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

-कॉंग्रेस (चिन्ह - पंजा)

- शहर आणि उपनगरांत पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करणे, या साठी प्रभावी व्यवस्था निर्माण करणे

-शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी मालकी हक्काचे 500 चौरस फुटांचे पक्के घर उपलब्ध करून देणे

- ससूनच्या धर्तीवर शहराच्या विविध भागात सार्वजनिक रुग्णालये उभारणे

- निर्माण होणारे सांडपाणी, कचऱ्यावर पुरेपूर प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची आखणी करणे

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करणे

- सर्व जाती- धर्मियांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यावर भर देणे

- प्रशासकीय कामकाजातील भ्रष्टाचार कमी करणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune development agenda of Congress for Vidhan Sabha 2019