पुण्यात डिस्चार्जनंतर पेशंट 'नॉट रिचेबल'

ज्ञानेश सावंत
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोनाबाधितांवरील उपचार आणि होम क्वारंटाइनचा कालावधी कमी झाल्याने कोरोनामुक्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पूर्वीच्या 14 ऐवजी आता आठ ते दहा दिवसच उपचार होत आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सवलत आहे. मात्र, कोरोनामुक्त (होम क्वारंटाइन) आणि घरीच राहिलेल्या (होम आयसोलेशन) रुग्णांच्या हालचालींवर आरोग्य खात्याचे अधिकारी लक्ष ठेवत आहेत.​

पुणे : हॅलो, पेशंट कसे आणि कुठे आहात, काही त्रास होतोय, घराबाहेर जात नाही ना, अशा काळजीतून महापालिका कोरोनामुक्तांना रोज फोन करतेय; पण गेल्याच पाच दिवसांत घरी सोडलेल्या हजार-दीड जणांचे फोन लागेनासे झाल्याने महापालिकेच्या काळजीत भर पडली आहे. तर शोधमोहिमेचा वेग वाढवूनही नव्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती सापडत नसल्याने महापालिकेचा ताप वाढला आहे. परिणामी, हे लोक घराबाहेर जात असल्याच्या शक्‍यतेने त्यांना रोखण्यासाठी घराच्या दारावर स्टिकर लावले जाणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधितांवरील उपचार आणि होम क्वारंटाइनचा कालावधी कमी झाल्याने कोरोनामुक्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पूर्वीच्या 14 ऐवजी आता आठ ते दहा दिवसच उपचार होत आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सवलत आहे. मात्र, कोरोनामुक्त (होम क्वारंटाइन) आणि घरीच राहिलेल्या (होम आयसोलेशन) रुग्णांच्या हालचालींवर आरोग्य खात्याचे अधिकारी लक्ष ठेवत आहेत. त्यातून संबंधित व्यक्ती घरी आहे का, त्यांची प्रकृती कशी आहे, या बाबी जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. दुसरीकडे, हे नागरिक सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनामुक्त आणि होम आयसोलेशनच्या रुग्णांना रोज किमान एक फोन करून त्याची चौकशी केली जात आहे. गेल्या दहा दिवसांत सोडलेल्या सुमारे 5 हजार 664 जणांच्या मोबाईलवर संपर्क साधला; तेव्हा शुक्रवारी दिवसभरात 4 हजार 336 जणांनी प्रतिसाद दिला. तर 1 हजार 308 नागरिकांचे फोन लागलेले नसल्याचा अहवाल आहे. त्याआधी शुक्रवारी सहा हजार जणांपैकी 12 लोकांचा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क होत नसलेल्यांपैकी बहुतांश जणांना किमान आठ ते 14 दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यांच्या संवाद होत नसल्याने आरोग्य खात्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार...

याबाबत महापालिकेचे उपायुक्त (तांत्रिक विभाग) संजय गावडे म्हणाले, "उपचारानंतर घरी सोडलेल्या व्यक्तींना फोन करून तब्येतीची विचारपूस केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहोत. मात्र, काही लोकांचे फोन लागत नाहीत.''

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

रुग्ण वाढण्याचा अंदाज
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून नवे रुग्ण आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे पुढील काही दिवसांत हे आकडे वाढण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका कठोर पावले उचलत असून, घरी सोडलेल्या आणि घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या घरांवर स्टिकर लावण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी यांनी स्पष्ट आहे. या आधी घराच्या दारावर छोटे स्टिकर्स लावण्याचा प्रयोग झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune difficult to track Corona Patients after discharge