Corona Updates: पुण्यात रुग्णांची संख्या वाढतीच; दिवसभरात 1080 रुग्णांची पडली भर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 344 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 7 हजार 125 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.28) दिवसभरात 1080 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 528 जण आहेत. शनिवारी दिवसभरात 10 हजार 622 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय 763 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील आठ दिवसांपासून सातत्याने रोज दिवसभरातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आजही कमीच आहे. पुणे शहरातील नव्या रुग्णांची संख्या आज वाढली आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी चिंचवडमधील सहा, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला नाही.

Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 344 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 7 हजार 125 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 41 हजार 540 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 21 हजार 855 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 403 रुग्ण आहेत.

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 217, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 246, नगरपालिका क्षेत्रात 69 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 20 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही शुक्रवारी (ता.27) रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी (ता.28) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

संस्थानिहाय आतापर्यंतचे एकूण रुग्ण

- पुणे महापालिका (शहर) - 1 लाख 69 हजार 394.

- पिंपरी-चिंचवड - 91 हजार 967.

- जिल्हा परिषद कार्यक्षेत्र - 56 हजार 794.

- नगरपालिका (14) - 16 हजार 848.

- कॅंटोन्मेंट बोर्ड (03) - 6 हजार 537

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 1080 new corona patients found on Saturday 28th November