पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24) 3521 नवे कोरोना रुग्ण: मृत्यूचा आकडा ६००० पार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24 ) दिवसभरात एकूण 3 हजार 521 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 512 जण आहेत. आज दिवसभरात 3 हजार 402 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24 ) दिवसभरात एकूण 3 हजार 521 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 512 जण आहेत. आज दिवसभरात 3 हजार 402 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच आज पिंपरी चिंचवडमध्ये 784, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 907, नगरपालिका क्षेत्रात 268, आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 50 नवे रुग्ण सापडले आहेत.

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

आज 78 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 42 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील16, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 14, नगरपालिका क्षेत्रातील 4 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता.23) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.25) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

मेट्रोच्या जागा तातडीने ताब्यात घ्या - अजित पवार

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 1 हजार328, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 262, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 560 , नगरपालिका क्षेत्रातील 202 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 50 जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 65 हजार 204 झाली आहे.

"लाइफलाइन' पोलिसांच्या रडारवर;तरुणीचा शोध न लागल्याने कामाची तपासणी सुरू

मृत्यूंचा 6 हजारांचा आकडा पार
दरम्यान, मागील साडेसहा महिन्यांपासून आजतागायत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा सहा हजारांचा आकडा पार झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 3 हजार 406, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 206, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 920, नगरपालिका क्षेत्रातील 337 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 163 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 228 रुग्ण आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune district 3521 new corona patient found at thursday