esakal | कोरोना कमी व्हायचं नाव घेईना; दिवसभरात आढळले ४ हजारापेक्षा जास्त रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Patients

शुक्रवारी ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४४ जण आहेत.

कोरोना कमी व्हायचं नाव घेईना; दिवसभरात आढळले ४ हजारापेक्षा जास्त रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) दिवसभरात ४ हजार ९३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ३ हजार ७८८ कोरोनामुक्त झाले आहेत. 

दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ८९१ जणांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ८४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९९१, नगरपालिका क्षेत्रातील २९२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ७६ नवे रुग्ण सापडले आहेत. 

आयुक्त-महापौरांच्या भूमिकेमुळं पुणेकरांची झालीय कोंडी; महापालिका प्रशासनात 'गोंधळ'!​

दरम्यान, शुक्रवारी ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४४ जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील १४, जिल्हा परिषद क्षेत्रातील १९, नगरपालिका क्षेत्रातील ७ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही गुरुवारी (ता.१७) रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी (ता.१८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

फक्त दहा सेकंदात होणार कोरोनाचं निदान; मराठमोळ्या शास्त्रज्ञानं विकसित केलं यंत्र!

गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ९२६, पिंपरी चिंचवडमधील ८६२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६६८, नगरपालिका क्षेत्रातील २८० आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ५२ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ९६ हजार ५५९  झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार ५३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील १९७ जण आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image