esakal | आयुक्त-महापौरांच्या भूमिकेमुळं पुणेकरांची झालीय कोंडी; महापालिका प्रशासनात 'गोंधळ'!
sakal

बोलून बातमी शोधा

PMC_Pune

महापालिकेतील पदाधिकारी म्हणजे महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्यात बैठक होऊन पुणेकरांसाठीचा निर्णय पुढे येण्याची आशा होती.

आयुक्त-महापौरांच्या भूमिकेमुळं पुणेकरांची झालीय कोंडी; महापालिका प्रशासनात 'गोंधळ'!

sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी पुणेकरांवर काही बंधने घालण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे गुरुवारचे संकेत, लोकप्रतिनिधींशी बोलून निर्णय घेण्याचा पालकमंत्री अजित पवार यांचा 'सल्ला' आणि आता पुणेकरांवर तुर्तास कुठचीच बंधने लादणार नसल्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका... या साऱ्यांच्या गोंधळाने पुणेकरांची मात्र 'कोंडी' केल्याचे दिसत आहे.

फक्त दहा सेकंदात होणार कोरोनाचं निदान; मराठमोळ्या शास्त्रज्ञानं विकसित केलं यंत्र!

नागरिकांवर बंधने आणणार का, त्यावरील निर्णयाबाबत महापालिकेतील लोकप्रतिनिधी-आयुक्त यांच्यात चर्चा झाली का? या मुद्यावर खरोखरीच चर्चा केली असेल; तर तिचा तपशिल काय? हे लोकप्रतिनिधी सांगत नाहीत आणि आयुक्त विक्रम कुमारही आता स्पष्ट बोलत नाहीत. यासंदर्भात पोलिसांशी चर्चा झाली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले, पण बंधनांचा निर्णय होईल का, हे विक्रम कुमार यांनी सांगितले नाही. परिणामी, पुणेकरांच्या पुढे या मंडळींनी नेमके काय वाढून ठेवले आहे, हे कोणालाच सांगता येईनासे झाले आहे. 

'पुण्यातील सेवेचा प्रवास कायम आठवणीत राहील'; डॉ. वेंकटेशम यांचा भावनिक संदेश​

पुण्यावर कोरोनाने आपली पकड मजबूत केल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांवर काही मर्यादा आणून रस्त्यांवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास कारवाईचे संकेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी दिले. तसे आदेश काढले जातील, हेही आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेतच्या बैठकीत निर्णय होईल आणि नवे आदेश काढले जातील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती.

प्रत्यक्षात, आयुक्तांच्या भूमिकेवर फारशी चर्चा न करता, लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन निर्णय घेण्याचा सल्ला पवार यांनी दिला. त्यानंतर महापालिकेतील पदाधिकारी म्हणजे महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्यात बैठक होऊन पुणेकरांसाठीचा निर्णय पुढे येण्याची आशा होती. परंतु, नावापुरत्या चर्चेपलीकडे महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत काहीच घडले नाही. त्यामुळे पुणेकरांच्या गोंधळात भरच पडत गेली. 

अबुधाबीतील कंपनीच्या प्रस्तावाला डीएसकेंचा हिरवा कंदील; सुचवले तीन पर्याय​

या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, "कोरोनाशी लढताना प्रत्येक पुणेकरांनी पावलोपावली साथ दिली आहे. ते अजूनही संयमाने आणि प्रत्येक आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. मात्र, सध्या तरी पुणेकरांवर कोणतीही बंधने नसतील. मात्र, आपण सारेजण सुरक्षित राहावेत, यासाठी या पुढच्या काळातही काळजी घेतली पाहिजे. गर्दी ठिकाणी फिरताना नियमांचे पालन केले पाहिजे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)