वाढता वाढता वाढे कोरोनाग्रस्तांची संख्या; पुण्यात नोंदवला आतापर्यंतचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.९) दिवसभरात तब्बल ४ हजार ८८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील नव्या रुग्णांचा आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. एकाच दिवसात पावणेपाच हजारांहून अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकाच दिवसात एक हजारांहून अधिक रूग्ण सापडण्याची घटनाही बुधवारी पहिल्यांदाच घडली आहे. 

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

बुधवारच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ७८ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २४०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १५२, नगरपालिका क्षेत्रात ३३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ८० नवे रुग्ण सापडले आहेत.

मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ७, जिल्हा परिषद क्षेत्रातील १६, नगरपालिका क्षेत्रातील २ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवार (ता.८) रात्री ९ वाजल्यापासून बुधवार (ता.९) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

विनामास्क फिरणारे नागरिक पोलिसांच्या रडारवर; आठवडाभरात 'इतक्या' पुणेकरांवर झाली कारवाई

दरम्यान, बुधवारी दिवसभरात ३ हजार ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २ हजार १३, पिंपरी चिंचवडमधील ५०२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३४७, नगरपालिका क्षेत्रातील १५२आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ७१जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६३ हजार ७१ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत  ४ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 
१६० रूग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 4885 new corona patients found on Wednesday 9th September