Corona Updates: पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सहाशेच्या आत!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये160, जिल्हा परिषद क्षेत्रात 137, नगरपालिका
क्षेत्रात 54 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 6 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.6) दिवसभरात 598 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 241 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 6 हजार 595 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत 658 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 27 हजार 125 झाली आहे. यापैकी 3 लाख सात हजार 956 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत 8 हजार 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 372 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे : खुन्याला जन्मठेप, तर मदत करणाऱ्याला दोन वर्षे तुरुंगवास​

शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये 160, जिल्हा परिषद क्षेत्रात 137, नगरपालिका
क्षेत्रात 54 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 6 नवे रुग्ण सापडले आहेत.
दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 12 जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील 4, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 6, नगरपालिका कार्यक्षेत्रातील 3 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवारी (ता.5) रात्री 9 वाजल्यापासून शुक्रवारी (ता.6) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 14 लाख 55 हजार 728 कोरोना चाचण्या घेण्यात
आल्या आहेत. यापैकी पुणे शहरातील 7 लाख 50 हजार 412 चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 4 लाख 15 हजार 905, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 2 लाख 7 हजार 591, नगरपालिका क्षेत्रात 63 हजार 457 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रात 18 हजार 323 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातही यंदा फटाक्‍यांना बंदी घाला; पुणेकराने उच्च न्यायालयात केली याचिका दाखल​

क्षेत्रनिहाय कोरोनामुक्त रुग्ण :

- पुणे शहर - 1 लाख 53 हजार 139.

- पिंपरी चिंचवड - 85 हजार 213.

- जिल्हा परिषद - 49 हजार 476.

- नगरपालिका - 14 हजार 376

- कॅंटोन्मेंट बोर्ड - 5 हजार 754

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 598 new corona patients found on 6th November 2020