
नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवारी (ता.26) रात्री आठ वाजल्यापासून शुक्रवारी (ता.27) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.27) दिवसभरात 898 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 406 जण आहेत. शुक्रवारी दिवसभरात 10 हजार 571 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याशिवाय 674 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आजही कमीच आहे. अन्य नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- महत्त्वाची बातमी: बॅकलाॅग परीक्षेची तारीख ठरली; पुणे विद्यापीठाने वेळापत्रकात केले बदल
दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील दोन, पिंपरी-चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे. नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 371 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 799रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 40 हजार 460 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 21 हजार 92 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 397 रुग्ण आहेत.
- BHR पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी संचालकांच्या घरी छापे; रात्री उशिरापर्यंत चौकशी
शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 235, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 200, नगरपालिका क्षेत्रात 55 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 2 नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही गुरुवारी (ता.26) रात्री आठ वाजल्यापासून शुक्रवारी (ता.27) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.
- पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल
आतापर्यंत 16 लाखांहून अधिक चाचण्या
पुणे जिल्ह्यात आजअखेरपर्यंत 16 लाख सहा हजार 85 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 8 लाख 8 हजार 648 चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 4 लाख 63 हजार 985, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 2 लाख 43 हजार 251, नगरपालिका क्षेत्रात 70 हजार 159 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 20 हजार 42 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)