
पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांच्या ठेवी माघारी न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या तीन पथकाकडून जळगाव आणि औरंगाबाद येथे छापे घातले.
पुणे : ठेवीदारांची फसवणूक करीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेच्या संचालकांच्या घरी शुक्रवारी (ता.२७) छापे घातले. जळगाव आणि औरंगाबाद येथील संचालकांच्या घरी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे छापे घातले. रात्री उशिरापर्यंत संचालकांची चौकशी सुरू होती.
- पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल
पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांच्या ठेवी माघारी न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या तीन पथकाकडून जळगाव आणि औरंगाबाद येथे छापे घातले. पुणे, पिंपरी आणि ग्रामीण पोलिसांकडे या घोटाळ्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. त्यादृष्टीने पतसंस्थेच्या अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील शिवाजीनगरमधील घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी छापा घातल्याने चांगलीच खळबळ उडाली.
- पुणे विद्यापीठ : परीक्षा विभागात विद्यार्थ्यांला बेदम मारहाण
पतसंस्थेच्या कार्यालयास शहरातील काही ठिकाणीही आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू केली आहे. याबरोबरच औरंगाबाद येथील संचालकांच्या घरीही पथकाने छापे घालून कारवाई केली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती, असे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)