Corona Effect : पुणेकरांनो, तुम्ही परदेशात कुठं कुठं फिरला? प्रशासनाला नक्की सांगा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

- नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 
- खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवावे. 
- नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

पुणे : गेल्या महिनाभरात परदेशांमध्ये प्रवास करणाऱ्या तसेच, येथील हॉटेलमध्ये मुक्‍कामी असलेल्या परदेशी नागरिकांबाबत पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाला कळविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्‍तांनी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हॉटेल व्यवसायिक, पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांशी गुरुवारी संवाद साधला. हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेतल्यास कोरोना प्रतिबंधाबाबत मदत होणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी याबाबत प्रशासनास सहकार्य करावे. तसेच, सर्व टूर ऑपरेटरनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी. त्यापैकी एखाद्या प्रवाशाला ताप, खोकला असल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांना दिल्या. 

- पुणे : कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; सायबर पोलिसांचा 'वॉच'!

या बैठकीस पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम, महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड, श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह हॉटेल व्यावसायिक, पर्यटन कंपन्यांचे प्रमुख आणि प्रशासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

- मला मिळालं नाही, पण नाथाभाऊंना तरी तिकीट द्यायला पाहिजे होतं!

घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या 
शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्‍यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासनाकडून आवश्‍यक खबरदारी घेण्यात येत आहे. घाबरू नका, सावध रहा आणि लक्षणे दिसल्यास उपचार घ्या, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी केले.

 - Coronavirus : देशात ५२, तर राज्यात 'या' ठिकाणी आहेत 'कोरोना टेस्ट लॅब'!

जगातील 118 देशांमध्ये कोरोना आजार आढळला आहे. त्यामुळे याबाबत प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. प्रशासकीय यंत्रणेनेच जनजागृतीचे कार्य व्यापक प्रमाणात हाती घेण्यात यावे. बस स्टॅंड, होर्डींग्ज्‌, दूरदर्शन, रेडिओ या माध्यमांचा जनजागृतीसाठी प्रभावीपणे वापर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

हे करा - 
- करोना विषाणूचा प्रसार प्रामुख्याने हवेद्वारे, शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन या कारणांमुळे होतो. 
- तो टाळण्यासाठी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. 
- शिंकताना, खोकतांना नाक आणि तोंडावर रुमाल धरावा. 
- नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 
- खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवावे. 
- नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District administration collect the data of citizens who traveled abroad in a month