esakal | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कान्हे शाखेच्यावतीने पीक कर्ज वाटपास सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Pune District Central Co-operative Bank started distributing crop loan on behalf of Kanhe branch

ज्या शेतकऱ्यांनी मार्च २०२० अखेर पीक कर्ज भरलेले आहे अशा शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात ५५ सभासदांना ३५ लाखाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनामुळे लॅाकडाऊन केल्याने शेतकर्यांना 0% व्याजाचा लाभ मिळण्यासाठी मे २०२० पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकरी सभासदांनी आपले कर्ज भरुन पुन्हा पीक कर्ज घ्यावे असे आवाहन कान्हे वि. का. सोसायटीच्या वतीने करण्यात आले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कान्हे शाखेच्यावतीने पीक कर्ज वाटपास सुरुवात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक : लॉकडाऊन काळात मावळामध्ये सर्व प्रथम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कान्हे शाखेमार्फत कान्हे विविध कार्यकारी सोसायटीच्यावतीने शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२०- २१ करिता पीक कर्जाचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ज्या शेतकऱ्यांनी मार्च २०२० अखेर पीक कर्ज भरलेले आहे अशा शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात ५५ सभासदांना ३५ लाखाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनामुळे लॅाकडाऊन केल्याने शेतकर्यांना 0% व्याजाचा लाभ मिळण्यासाठी मे २०२० पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकरी सभासदांनी आपले कर्ज भरुन पुन्हा पीक कर्ज घ्यावे असे आवाहन कान्हे वि. का. सोसायटीच्या वतीने करण्यात आले.

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद
यावेळी संस्थेचे चेअरमन उर्मिला जांभुळकर, व्हा.चेअरमन बाळु काकरे, सर्व संचालक मंडळ, संस्था सचिव, मावळ सचिव, बँक अधिकारी, प्रगतीशील शेतकरींसह सभासदही उपस्थित होते.
Coronavirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लढा ‘वॉर रूम’मधूनही

loading image