
Pune Collector Transfer : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र दुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी तात्काळ पदभार स्विकारावा असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भात आदेश काढला आहे.