

Baramati Topples Pune & Pimpri-Chinchwad: District Topper in HSC Results 2026
बारामती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक निकाल बारामतीचा जाहीर झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडला मागे सारत यंदा बारामती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
बारामती तालुक्याचा निकाल 96.30 टक्के जाहीर झाला आहे. तालुक्यातून 8684 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 8363 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.