Pune: जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १२० नवे कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १२० नवे कोरोना रुग्ण

पुणे, ता. १५ ः पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता. १५) दिवसभरात १२० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील ४८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याऊलट १८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांत पुणे शहरातील ४८ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३१, नगरपालिका सहा आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गेल्या २४ तासात नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

हेही वाचा: पर्यटन स्थळावरील गर्दी थांबविण्यासाठी कंट्रोल ट्युरिझमची आवश्‍यकता

दिवसातील एकूण कोरोनामुक्त रुग्णात पुणे शहरातील ५४, पिंपरी चिंचवडमधील ४४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७० आणि नगरपालिका हद्दीतील १२ जण आहेत. कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकही रुग्ण आज कोरोनामुक्त झाला नाही.

सोमवारी पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आत आली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ९९५ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी १ हजार ७९ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. उर्वरित ९१६ जण गृह विलगीकरणात आहेत.

loading image
go to top