
रेल्वेच्या पुणे विभागासाठी केंद्र सरकारने कोणतीही नवी घोषणा केली नसली तरी, सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे - रेल्वेच्या पुणे विभागासाठी केंद्र सरकारने कोणतीही नवी घोषणा केली नसली तरी, सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. हडपसर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला झालेल्या तरतुदीची माहिती मध्य रेल्वेला नुकतीच मिळाली. या पार्श्वभूमीवर पुणे विभागासाठी झालेल्या तरतुदींची माहिती शर्मा यांनी दिली. या अर्थसंकल्पात पुणे विभागात सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण व्हावीत, यावर भर देण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘हडपसर रेल्वे स्थानकाचे सुरू असलेले काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. सध्या हे काम सुमारे ३० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी ५५५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील वाहतूक वेगाने पूर्ण होऊ शकेल.’’ विभागीय सहव्यवस्थापक नीलम चंद्रा, सहर्ष वाजपेयी या प्रसंगी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सूत्रसंचालन केले.
तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न; काय आहे प्रकरण
महत्त्वाची कामे व तरतूद
"बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावर जाग आली का?", अजित पवारांचा बॉलिवूडकरांना सवाल
लोकल प्रवासासाठी वाट बघा !
पुणे-लोणावळा लोकलमध्ये मुंबईच्या धर्तीवर सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास केव्हा करता येणार, अशी विचारणा केली असता रेणू शर्मा यांनी रेल्वे मुख्यालयाकडे बोट दाखविले. प्रवाशांसाठी लोकल उपलब्ध करण्याची आमची तयारी आहे. मात्र, रेल्वे मुख्यालयाकडून याबाबत आदेश आलेले नाहीत. ते आल्यावर प्रवाशांसाठी लोकल खुली केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या मार्गावर सध्या लोकलच्या चार फेऱ्या होत असून त्यातून अत्यावश्यक सेवेतील सरासरी सुमारे ४२५ कर्मचारी रोज प्रवास करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Edited By - Prashant Patil