

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठेत शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. भावे हायस्कूलजवळ चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेल्यांना एका कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तब्बल १२ जण जखमी झाले असून सर्वजण एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी असल्याचं समजते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.