

Incident Overview: Pune Valet Parking Accident
पुणे : मद्यधुंद अवस्थेत भरधाव चारचाकी चालवून व्हॅले पार्किंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला चिरडल्याप्रकरणी वाहनचालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रताप ऊर्फ प्रतापसिंग भारतराव दाईंगडे (वय ४९, रा. धानोरी, मूळ रा. नेरूळ, नवी मुंबई) असे आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. या अपघातात सतेंद्र मोती मंडल (वय ३०, रा. वडगाव शेरी, मूळ रा. बिहार) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आरोपीने कुठे मद्यप्राशन केले होते; तसेच त्याने अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याचा तपास येरवडा पोलिस करत आहेत.