Pune Threat calls : मुंबईत दहशतवादी घुसल्याचा बनावट कॉल; पुण्यातही बॉम्ब स्फोटाची धमकी देणारे फोन; हडपसरमधला 'तो' आहे तरी कोण?

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध पोलिस ठाण्यांमध्ये शुक्रवारी धमकीचे फोन गरजले. शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी या फोनमधून देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
Pune Threat calls
Pune Threat calls esakal

पुणेः पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध पोलिस ठाण्यांमध्ये शुक्रवारी धमकीचे फोन गरजले. शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी या फोनमधून देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारे फोन आल्याने खळबळ उडाली होती. पुण्यासह मुंबईत देखील बॉम्बस्फोट करण्याचा कॉल करून माथेफिरूंकडून धमकी देण्यात आली होती.

या फोननंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवली. कॉल करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांकडून अटक केली आहे. धमकीचा कॉल करणारा एक माथेफिरू असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्या माथेफिरुने अफवा पसरवल्याचं पोलिस तापासात उघड झालं आहे.

Pune Threat calls
Dhangar Community : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार

कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. एका माथेफिरुमुळे शुक्रवारी पुण्यातील पोलिसांची तारांबळ उडाली. थेट बॉम्बची धमकी दिल्याने जरावेळ गोंधळदेखील उडाला. परंतु पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या माथेफिरुला ताब्यात घेतलं आहे.

मुंबईत दहशतवादी घुसल्याचा कॉल

दुसरीकडे मुंबईत पोलिस कंट्रोल रुमला एक फोन आला, त्यात कॉलरने मुंबईत दहशतवादी घुसल्याचं म्हटलं. मुंबईतल्या डोंगरी भागात काही दहशतवादी घुसल्याचं सांगून आम्हाला पोलिसांची गरज असल्याचं त्याने म्हटलं. या कॉलनंतर पोलिसांनी तपास केला असता बनावट कॉल असल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी एकाता ताब्यात घेतलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com