
A farmer in Pune stages a hunger strike with banners on his vehicle, protesting against faulty land survey and demanding justice.
esakal
Summary
मुळशी तालुक्यातील शेतकरी अरुण राऊत आपल्या जमिनीवरील चुकीच्या शासकीय मोजणीविरोधात सलग चार वेळा आमरण उपोषणास बसला आहे.
राऊतांचा आरोप — मोजणी अधिकाऱ्यांनी आणि प्रतिस्पर्धीने संगनमत करून त्यांची जागा चुकीच्या गटात दाखवली आणि त्यामुळे कोर्टानेही चुकीचे आदेश दिले.
प्रशासनाने चूक मान्य केली असतानाही उपाय न केल्याने राऊतांनी बडतर्फीची मागणी आणि कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
पुण्यात एका शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन चर्चेत आहे. सलग तीन वेळा आमरण उपोषण करून देखील प्रशासनाला जाग न आल्याने मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क चारचाकी गाडीवरच उपोषणाचे बॅनर लावून पुण्यातील जमाबंदी आयुक्तांच्या कार्यलयासमोर उपोषण सुरु केले आहे. भूमापन अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. प्रशासनाने चूक मान्य केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी आजपर्यंत करत नसल्याने वैतागून शेतकरी चौथ्या वेळी उपोषणाला बसला आहे. मागणी मान्य झाल्याच आत्मदहनाचा इशारा दिला आहे.