भाजीपाला कवडीमोल !

राज्यात पंधरा दिवसांपासून दरात कमालीची घट
farmer
farmersakal

पुणे : टोमॅटो ३ ते ५ रुपये, ढोबळी ५ ते ८ रुपये, कोबी ३ ते ४, कारले ४ ते ५ असे सध्याचे दर पाहून भाजीपाला आणि फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मागणीच नाही, कोरोनोचे निर्बंध, आवक वाढलीय अशी कारणे व्यापारी दर घटण्यामागे देत आहेत. दुसरीकडे उत्पादन खर्चच निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत, तर काही हतबल शेतकऱ्यांनी काढणीच परवडत नसल्याने प्लॉटचे प्लॉट सोडून दिले आहेत.

संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आणि विविध प्रकारचा दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून यातील बहुतांश प्रकारांचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशातच बंद असलेले आठवडे बाजार, नव्याने पडणारे लॉकडाउन, अजूनही बंद असलेली धार्मिक स्थळे, लग्न आदी सोहळ्यांवरील मर्यादा अशा कोरोना निर्बंधांचा एकत्रित परिणाम या मागे दिसून येत आहे.

farmer
पुणे: फुगेवाडीत कोसळले घर

आठवड्यात निम्म्याने घट...

कोल्हापूर जिल्ह्यात टोमॅटोस दहा किलोस असणारा सरासरी २०० रुपयांचा दर आता ४० ते ८० रुपयांवर आला आहे. वांग्याचे दरही दहा किलोस ५० ते १२० रुपये इतके कमी झाले आहेत.

का होत आहेत दर कमी...

  • आवक वाढली; मागणीच नाही, व्यापाऱ्यांचे कारण

  • कोरोनामुळे व्यापारी, खरेदीदारांची संख्या कमी

  • परराज्यांतूनही महाराष्ट्रात भाजीपाल्याची मोठी आवक

  • कोरोना काळात दोन वर्षांपासून अशीच परिस्थिती

farmer
कोरोना मृत्युदरात पुणे एकतिसाव्या क्रमांकावर

ताण आणि तणाव...

  • रोग-किडींत वाढ; उत्पादन खर्च वाढला

  • खत, बियाणे, कीडनाशके यंदा महागली

  • उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल

  • कर्जबाजारीपणात वाढ; शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • प्रमुख भाजीपाला उत्पादन : मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर,

  • राजगिरी, माठ, चाकवत, अंबाडी, पुदिना, तांदुळका आदी.

  • प्रमुख फळभाज्या उत्पादन : टोमॅटो, ढोबळी, हिरवी

  • मिरची,वांगी, दोडका, कारले, भोपळा, गिलके, पडवळ,

  • काकडी आदी.

भाजीपाला उत्पादक प्रमुख जिल्हे : नाशिक, पुणे,कोल्हापूर,औरंगाबाद, नागपूर, नगर, रायगड, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद आदी.

या ठिकाणी पाठवला जातो भाजीपाला : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, दिल्ली, बंगळूर, कोलकाता, हैदराबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com