कोरोना मृत्युदरात पुणे एकतिसाव्या क्रमांकावर

पुण्यात कोरोना रुग्ण मृत्यूचं प्रमाण हे १.७ टक्के इतके आहे
corona death
corona deathesakal

पुणे : पुणे जिल्हा कोरोनाच्या मृत्युदरात राज्यात ३१व्या क्रमांकावर आहे. पुण्याचा मृत्युदर १.७ टक्के असून, सर्वांत कमी मृत्युदर बुलडाणा जिल्ह्यात आहे. अर्थात, बुलडाण्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाणदेखील कमी असल्याची माहिती पुढे आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यात होती.

corona death
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक

त्यामुळे येथे प्रत्येक एक लाख लोकसंख्येतील २०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णांची वाढती संख्या, ऑक्सिजनची वेगाने वाढणारी मागणी, व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णांचे प्रमाण या सर्व प्रतिकूल परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील आरोग्य सेवकांनी रुग्णसेवा केला. प्रशासनाने त्यासाठी तातडीने आरोग्याच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचा परिणाम कोरोनबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यात यश आले, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यात एप्रिलमध्ये एकेका दिवशी एक लाखांहून अधिक रुग्ण कोरोनाचे उपचार घेत होते. त्यातून रुग्णालयांवरील ताण वाढला होता. साथीचा या महाभयंकर उद्रेकातून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय सेवा केली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा जिल्ह्यातील मृत्युदर कमी ठेवण्यात यश आले. यापुढे नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.

बरे होणारे रुग्ण ९७ टक्के

साथीचा प्रचंड उद्रेक झालेल्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१ टक्के असल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. मुंबईमध्येही बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९७.१ आहे. मात्र, तेथे कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ४२ हजार ३ इतकी नोंदली गेली. त्याच वेळी पुणे जिल्ह्यात कोरोना झालेल्यांची संख्या ११ लाख १३ हजार १३५ होती. त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १० लाख ८१ हजार ६१ असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले.

corona death
अ‍ॅमेनिटी स्पेसवर राष्ट्रवादीची भूमिका रविवारी ठरणार?

पुणे जिल्ह्यातील स्थिती

११ लाख १३ हजार १३५ -कोरोनाबाधित

१२ हजार ६७३-उपचाराखालील रुग्ण

१० लाख ८१ हजार ६१-बरे झालेले रुग्ण

१९ हजार ५३-मृत्यू

तज्ज्ञ डॉक्टर, अद्ययावत वैद्यकीय उपकरणांमुळे पुण्यातील कोरोनाचा मृत्युदर नियंत्रित ठेवण्यात यश आले. बाधितांच्या मृत्यूनंतर मृत्यूचे विश्लेषण नेमकेपणाने होते. - डॉ. प्रदीप आवटे, साथ रोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com