Why Pune declared dry day on Ganesh Festival: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणपतीच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व दारू विक्रेत्यांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.