Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत कलावंतांच्या ढोल-ताशांचा गजर घुमणार

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत गेल्या काही वर्षांत मराठी कलाकारांचे ढोल-ताशा पथक, हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते आहे.
Actors Dhol Tasha
Actors Dhol TashaSakal

पुणे - गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत गेल्या काही वर्षांत मराठी कलाकारांचे ढोल-ताशा पथक, हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते आहे. नेहमी चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसणारे चेहरे पाहण्याची उत्सुकता नागरिकांना असते. हे कलाकारही आपल्या वादनातून मनोभावे गणरायाची सेवा करण्यासाठी कसून तयारी करतात.

यंदाही हाच उत्साह कायम ठेवत मिरवणुकीत आपल्या वादनाचा ठसा उमटवण्यासाठी हे कलाकार सज्ज झाले आहेत. त्यासाठी सोमवारी (ता. ७) कलावंत पथकाच्या वाद्यपूजनाने सरावाला प्रारंभ झाला.

गणेशोत्सवात कलावंतांचे ढोल-ताशा पथक असावे, अशी कल्पना अभिनेता आस्ताद काळे याला २०१४ मध्ये सुचली. त्याला मूर्त रूप देण्यासाठी अभिनेता सौरभ गोखले, श्रीकर पित्रे, तेजस कुलकर्णी, केतन क्षीरसागर, अमित रानडे आणि शाश्वती पिंपळीकर यांनी प्रयत्न केले. या पथकाने पहिल्यावर्षी तीन ढोल व दोन ताशांनी सरावाला सुरूवात केली.

आता या पथकात ६५ ढोल व २५ ताशे असून कलाकारांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यंदा या पथकाचे १० वे वर्ष असल्याने सर्वांनी गणेशोत्सवात जल्लोष करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सरावाला सुरूवात करण्यापूर्वी नूमवि प्रशालेत सोमवारी वाद्यपूजन सोहळा आयोजिला केला होता. त्यात २० ते २५ कलाकार सहभागी झाले होते.

पथकात यांचा सहभाग

अभिनेता आस्ताद काळे, सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, केतन क्षीरसागर, श्रीकर पित्रे, अनुजा साठे, श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित, शाश्‍वती पिंपळीकर, क्षितिश दाते, तेजस कुलकर्णी, स्वप्नाली पाटील, अमृता धोंगडे, आरती पाठक, आरोह वेलणकर, मोहन दामले, हार्दिक जोशी, तेजस बर्वे, श्‍वेता परदेशी, सुरभी हांडे, अमित रानडे.

मिरवणुकीत वादन

गणेश विसर्जन मिरवणुकीत कलावंत ढोल-ताशा पथकाला मानाच्या गणपती मंडळासमोर वादनाची संधी मिळते. कलाकारांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. विशेष म्हणजे सुरूवातीपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत कलाकार न थकता वादन करतात. मुंबईतील सिद्धीविनायकासमोरही त्यांना वादनाची संधी मिळते.

चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजमुळे कलाकार चित्रीकरणात व्यग्र असतात. त्यामुळे त्यांना कलागुणांना वाव देण्याची फारशी संधी मिळत नाही. ढोल-ताशा वादनाने कलाकारांमध्ये उर्जा संचारते. सर्व जण वादनाचा सराव करतात.

- सौरभ गोखले, अभिनेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com