
Vanraj Andekar vs Govind Komkar
ESakal
गणेशोत्सवादरम्यान झालेल्या एका धक्कादायक घटनेत आंदेकर टोळीने वनराज आंदेकर यांच्या एका वर्षापूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. नाना पेठेत, गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद कोमकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर यांच्यावर १ सप्टेंबर २०२४ रोजी गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. अलिकडच्या काळात झालेल्या हत्येकडे टोळीतील शत्रुत्वाचाच एक भाग म्हणून पाहिले जात आहे, ज्यामुळे शहर हादरले आहे. मात्र नेमके हे प्रकरण काय होते, असा सवाल आता समोर येत आहे.