Pune : गोष्ट पैशापाण्याची'चे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्यासह उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी

आपल्यापैकी प्रत्येकजण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो.
गोष्ट पैशापाण्याची
गोष्ट पैशापाण्याचीsakal

पुणे : 'गोष्ट पैशापाण्याची' या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संवाद साधण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. ते कार्पोरेट क्षेत्रासह जीवनामध्ये यश मिळविण्याविषयीचे आपले अनुभव यावेळी मांडणार आहेत. हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बॉयोसिस विश्वभवन येथे 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए)चे अध्यक्ष दिपक करंदीकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

आपल्यापैकी प्रत्येकजण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. भरपूर पैसे कमविण्याबरोबरच जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यशाची वाटचाल सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांना आकार देण्याचा आणि जीवनातील मूल्ये कमविण्यासाठी प्रफुल्ल वानखेडे यांनी केलेले मार्गदर्शन मौल्यवान ठरणारे आहे. सिम्बॉयोसिसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात कॉर्पोरेट क्षेत्रात तसेच जीवनामध्ये मोठे यश मिळविणाऱ्या मान्यवरांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे.

एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीरकर यांनी राज्यासह देशभरातील विविध संस्थांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिले आहे. राज्य सरकारच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या उद्योजकीय वाटचालीच्या अनुभवातून उपस्थितांना मौलिक विचारांचे मार्गदर्शन मिळणार आहे. वाचक, युवक, विविध क्षेत्रातील सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या या कार्यक्रमाचा सर्वांनी आवश्‍य लाभ घ्यावा, असे आवाहन सकाळ प्रकाशनतर्फे करण्यात येत आहे.

प्रफुल्ल वानखेडे हे औष्णिक उर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचबरोबर ते अनेक कंपन्यांचे संस्थांपक-अध्यक्ष आणि पुस्तकप्रेमी आहेत. त्यांच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाने अल्पवधीतच खपाचा विक्रम केला. लवकरच त्याचे इंग्रजीतील भाषांतर 'Values of Money' वाचकांच्या भेटीस येणार आहे. मराठीतील या पुस्तकाची एका महिन्यात पहिल्या आवृत्तीच्या ३० हजार प्रतींची विक्री झाली असून दुसर्‍या आवृत्तीच्याही ३० हजार प्रती प्रकाशित झाल्या आणि ६० हजार प्रतींच्या विक्रीकडे वाटचाल सुरू आहे.

अनेक तरुणांनी हे पुस्तक आपल्याला यापूर्वीच मिळाले असते तर आणखी प्रगती केली असती, असा अभिप्राय दिला. जीवनाचे आणि पैशाचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयी हे पुस्तक मित्र बनून मार्गदर्शन करते, असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला. अशा पुस्तकाच्या लेखकाशी संवाद करणे ही तरुणांसाठी सुवर्णसंधीच असणार आहे.

कार्यक्रम – लेखकासह यशस्वी उद्योजकांशी संवाद

कधी - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022

केव्हा - सायंकाळी सहा वाजता

कुठे - सिम्बॉयोसिस विश्वभवन , सेनापती बापट रस्ता, पुणे

प्रवेश – सर्वांसाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com