

Centrifugal Velocity Deflection: Yamaha R15 Loses Traction at Nevalwadi Phata Bridge
घोडेगाव : घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावरील शिनोली (ता आंबेगाव) गावच्या हद्दीत नेवाळवाडी फाट्याजवळ (बुधवार, दि. १७) सकाळी 10 च्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या सिमेंटच्या कठड्याला जोरात धडकली. या अपघातात दुचाकीचालक तरुण पुलावरून थेट खाली पाण्यात कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रुपेश रमेश बगळे (रा. मुरबाड टेंबरे, ता. मुरबाड, जि. ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीचालक तरुणाचे नाव आहे.