Pune Govar Outbreak: पुणे शहरात गोवरचा उद्रेक! एकाच दिवशी आढळले ११ बाधित बालकं

एकाच भागात सर्वाधिक बाधित रुग्णांची संख्या
Rubella will be vaccinated to one and half million students of the district
Rubella will be vaccinated to one and half million students of the district
Updated on

पुणे : देशासह मुंबईत थैमान घातलेल्या गोवरच्या आजाराचा आता पुण्यातही उद्रेक पहायला मिळाला आहे. कारण एकाच दिवशी शहरात ११ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच भागातून सर्वाधिक गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. (Pune Govar Outbreak 11 infected children were found on a day)

Rubella will be vaccinated to one and half million students of the district
Maharashtra-Karnataka Row: दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर झाले महत्वाचे निर्णय; अमित शहांनी दिली माहिती

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुण्यातील एकाच भागातून सर्वाधिक गोवरच्या रुग्णांची संख्या आढळून आली आहे. शहरातील भवानी पेठेत ११ बालकांना गोवरची लागण झाली आहे. तर संपूर्ण पुणे शहरात आत्तापर्यंत ३१४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

Rubella will be vaccinated to one and half million students of the district
Boycott Pathaan: शाहरुख-दिपिकाचा 'बेशरम रंग' पाहून नेटकरी भडकले; बॉयकॉट ट्रेन्ड सुरु

भवानी पेठ हा पुण्यातील मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे. कोविड काळात देखील याच भागात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत होती. गोवर हा देखील संसर्गजन्य आजार असल्यानं अशा दाट वस्तीत या रोगाचा फैलाव लवकर होण्याची शक्यता असते, अशी माहिती आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

हे ही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

दरम्यान, गोवरच्या या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी कुटुंबातील ९ महिने ते ५ वर्षापर्यंत वयोगटातील बालकांना गोवरची लस तातडीने द्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com