पुणे पोटनिवडणूक : ग्रामपंचायतींच्या ५०३ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vote

पुणे पोटनिवडणूक : ग्रामपंचायतींच्या ५०३ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान

पुणे : पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतींमधील ५०३ ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे आकस्मिक निधन, राजीनामा, अपात्र ठरल्याने रद्द झालेले सदस्यत्व आणि अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरुन गोंधळ! उपसचिवांचं पत्रक व्हायरल

या निवडणुकीसाठी इच्छुकांना येत्या ३० नोव्हेंबरपासून सहा डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ डिसेंबरला होणार आहे. उमेदवाराची अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

पोटनिवडणुकीच्या ग्रामपंचायतींची व रिक्त जागांची संख्या

गाव : ग्रामपंचायती : जागा

 • वेल्हे ४३ ६५

 • भोर ७१ १२१

 • पुरंदर १६ २७

 • दौंड ०६ ०६

 • बारामती १० १३

 • इंदापूर ०६ ०८

 • जुन्नर ३१ ५५

 • आंबेगाव ३३ ५५

 • खेड ३६ ४९

 • शिरूर ०८ १२

 • मावळ १५ १९

 • मुळशी ३५ ६३

 • हवेली ०७ १०

 • एकूण ३१७ ५०३

loading image
go to top