नातवाने केलेल्या मारहाणीत आजीचा मृत्यू

जेवणासाठी शिळी भाजी दिल्याने आजीला गरम तेलावर ढकलून देत नातवाने मारहाण केली. या मारहाणीत आजीचा मृत्यू झाला आहे.
crime news
crime newsSakal
Summary

जेवणासाठी शिळी भाजी दिल्याने आजीला गरम तेलावर ढकलून देत नातवाने मारहाण केली. या मारहाणीत आजीचा मृत्यू झाला आहे.

पुणे - जेवणासाठी शिळी भाजी दिल्याने आजीला (Grandmother) गरम तेलावर ढकलून देत नातवाने मारहाण (Beating) केली. या मारहाणीत आजीचा मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बुधवारी (ता. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

मथुराबाई पांडुरंग कोळेकर ( वय 72, रा. आंबेडकरनगर वसाहत) असे वृद्ध महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी लक्ष्मण बाबू पांढरे ( वय 24) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर रात्री उशीरापर्यत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आज्जी घसरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा बनाव पांढरे याने केला होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवक्यावर पांढरे याने मारहाणीत आजीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरे हा मथुराबाई यांच्या मुलीचा मुलगा असून तो खाजगी ठिकाणी वाहन चालक म्हणून काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी घरात दारू पीत. तसेच क्षुल्लक कारणावरून आजीबरोबर भांडण करीत. पांढरे याचा बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिळ्या भाजीवरून आजीसोबत वाद झाला. त्यावेळी त्याने आजीला जोरदार आपटले व मारले त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून बाहेर निघून गेला होता.

crime news
पुणे प्रकल्पांसाठी क्रेडीट नोट अन क्रेडिट बॉण्डमधून दरवर्षी ४०० कोटी; विक्रम कुमार

दुपारी साडेतीनच्या दरम्यान पांढरे पुन्हा घरी आला. त्यावेळी शेजारील लोकांनी बराच वेळ झाला तरी आज्जी घराबाहेर आली नाही म्हणून पहाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजाऱ्यांना आजी मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. मात्र तोपर्यंत पांढरे तेथून पळून गेला होता.

घटनास्थळी मार्केट पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी भेट दिली. पांढरे याची माहिती घेतली असता तो मार्केट परिसरात फिरत आहे असे समजले. पोलिस कर्मचारी अनिस शेख, घुले, तनपुरे यांनी त्याला मार्केटयार्ड पीएमपीएल बस स्थानकाजवळ पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com